Welcome videos मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे

आदरणीय अभय सर,

संस्थापक, संचालक ‘HELLO MPSC’

एक प्रेरणादायक व द्रष्टे व्यक्तिमत्त्व

तळागाळातून वर येऊन स्वकर्तृत्वाने दैदिप्यमान यश मिळविणारे श्री. अभय लांडगे सर हे एक प्रेरणादायक व्यक्तिमत्त्व आहे.

2012 ते 2016 या पाच वर्षाच्या कालखंडात गणित, बुद्धिमत्ता आणि मराठी Comprehension या विषयांच्या शिक्षणप्रणालीत श्री. अभय सरांनी अक्षरश: अधिराज्य गाजविले आहे. अवघ्या महाराष्ट्रात CSAT या विषयाचे पहिले शिक्षकपद श्री. अभय सरांनी भूषविले आहे. CSAT, STI, PSI, मंत्रालय सहाय्यक आणि वनखात्याच्या परीक्षांची तयारी करायची असल्यास 100 टक्के याच एका व्यक्तिचे मार्गदर्शन घ्यावे लागे. त्या काळात यशवंत झालेले अनेक उच्चपदस्थ अधिकारी त्यांचे विद्यार्थी होते. आजतागायत 20,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना त्यांच्या अमोघ वाणीने यशस्वी होण्याचा गुरुमंत्र दिला.

                 अनेक नामवंत परीक्षांमध्ये गुणवत्ता यादीत झळकण्याचा मान मिळवणाऱ्या अभय सरांनी लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून केमिकल इंजिनियरींगमध्ये B.Tech ही पदवी प्राप्त केली आहे. CAT, SSC, RBI, LIC AAO इ. विविध स्पर्धापरीक्षांमध्ये लक्षणीय यश मिळवले आहे. IIBF कडून घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षांमध्ये उतीर्ण होण्याचा बहुमान महाराष्ट्रात फक्त श्री. अभय सरांनी मिळवला आहे. CAT या भारतातील सर्वांत कठीण मानल्या जाणाऱ्या परीक्षेत श्री. अभय सरांनी 99.78 पर्सेंटाइल प्राप्त केले आहेत. जवळपास सर्व नामांकित IIM महाविद्यालयांमधून त्यांना प्रवेशासाठी बोलावणी आली होती, पण ती धूडकावून विद्यार्थ्यांचे करिअर घडविण्याचा वसा संभाळला. श्री. अभय सरांनी बँकिंग क्षेत्रातही दहा वर्षे उच्चपदावर काम केले आहे. परंतु, या क्षेत्रात त्यांचे मन रमले नाही. विद्यार्थ्यांना शिकविण्याची आत्यंतिक तळमळ असल्याने त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि विविध स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाचा वसा घेतला. गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी हे प्रत्येक परीक्षेतील मूलभूत घटक आहेत. या विषयांमध्ये प्राविण्य मिळविण्यासाठी ‘झटपट उत्तरांचे व आकलनाचे तंत्र’ शिकविण्यासाठी श्री. अभय सर प्रसिद्ध आहेत. त्यासाठी ‘वेळेचे व्यवस्थापन’ कसे करायचे हे सरांकडून आपल्याला शिकता येते.

                  राहुरी कृषीविद्यापीठ, अकोला कृषीविद्यापीठ, औरंगाबाद, बीड, गोंदिया, नागपूर अशा अनेक ठिकाणी श्री. अभय सरांनी MPSC परीक्षा मार्गदर्शनासाठी मोफत सेमिनार आयोजित केलेले आहेत. श्री. अभय सरांच्या विद्यार्थ्यांची यशोमालिका कधीही खंडित झालेली नाही. आजपर्यंत स्पर्धापरीक्षांची तयारी करणाऱ्या 20,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला आहे. महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षा क्षेत्रात श्री. अभय सरांचे विद्यार्थी सर्वाधिक संख्येने अधिकारीपद मिळविण्यात यशस्वी झालेले आहेत. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे दर वर्षी 15 ते 16 दिव्यांग विद्यार्थांची अधिकारीपदावर निवड श्री. अभय सरांच्या बहुमोल मार्गदर्शनामुळे घडून येत आहे..

                  आज या ॲप व वेबसाइटद्वारे असंख्य बुद्धिमान, महत्त्वाकांक्षी व स्वयंप्रेरित विद्यार्थ्यांना श्री. अभय सरांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळत आहे.

यशस्वी अधिकारी